अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यास सर्व ग्रामस्थांना यश आले.
बिनविरोध म्हणून निवडून दिलेल्या उमेदवारांमध्ये गावचे माजी सरपंच पांडुरंग शिदोरे, कांचन पांडुरंग शिदोरे, गणेश आदिनाथ शिदोरे, शिवाजी कराळे, संजीवनी दिलीप शिदोरे, रेखा सतीश शिदोरे, प्रियंका प्रशांत शिदोरे यांचा समावेश आहे.
सोमठाणे खुर्द गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब जाधव, कानिफनाथ शिदोरे, दिलीप शिदोरे, तालुका दूध संघाचे संचालक सतीश कराळे,
माजी सरपंच संभाजी शिदोरे यांच्यासह गावच्या सर्वच ज्येष्ठांसह तरुणांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली.
सोमठाणे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी या बिनविरोध सदस्यांमध्ये पांडुरंग शिदोरे व कांचन शिदोरे या दोन्ही बापलेकीला ग्रामपंचायमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी ग्रामस्थांनी दिली.