अहमदनगर बातम्या

आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला मदत द्या, नेवाश्यात मराठा कुणबी महासंघाची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हातील बजाजनगर येथील स्व. ओम मोरे (वय २०) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून नुकतेच बलिदान दिले. त्याने आपल्या आईला मोबाईलवर संदेश पाठवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केल्याचे सांगितले.

या घटनेमुळे सर्व सकल मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे स्व. ओम मोरे याच्या कुटुंबाला तातडीने मुख्यमंत्री सहायता निधी मधुन मदत मिळावी, यासाठी नेवासा येथे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार बिरादर व पोलीस निरक्षक बोंबे यांना काल गुरूवारी (दि.१४) निवेदन देण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात कुणबी मराठा महासंघाने म्हटले आहे की, राज्यातील सकल मराठा समाजाला नोकरी शिक्षण यामध्ये पुरेसे आरक्षण नसल्याने तरुण पिढी तणावात आहे. तसेच शेतकरी वर्गाला शेती मालाला हमी भाव नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे,

यासाठी राज्यात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. २०१८ मध्ये गंगापूर येथील स्व. काकासाहेब शिंदे यांनी पण प्रवरासंगम येथील गोदावरी नदीच्या पुलावरून नदीत उडी मारून मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले होते.

यावेळी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल दिनकर ताके, नेवासा तालुकाध्यक्ष भरत बेल्हेकर, उपाध्यक्ष बद्रीभाऊ चिंधे, प्रसिद्धी प्रमुख संदिप दरंदले, महिला तालुकाध्यक्षा नीलिमा अशोक वाबळे,

नेवासा शहरप्रमुख जयश्री चंद्रकांत शिंदे, उपाध्यक्ष उज्ज्वला गवळी, संपर्क प्रमुख लीलाताई मारकळी, शहर संघटक उषाताई मारकळी, अशोकराव वाबळे, दिलीप शिंदे आदी हजर होते.

Ahmednagarlive24 Office