यशोधन’मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत हेल्पलाइन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, जिल्हा व तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी काम केले जात आहे.

अतिगंभीर रुग्ण व इतर मदतीसाठी यशोधन कार्यालयातर्फे हेल्पलाईन सुरु केली आहे, अशी माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, संगमनेरमधील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व सहकारातील संस्थांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जात आहे. मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात रॅपिड टेस्ट सुरु आहेत.

घुलेवाडी रुग्णालयात कोविड तपासणी सुविधा केली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून कॉटेज हॉस्पिटल, मौलाना आझाद मंगल कार्यालय

तर अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून होस्टेलमध्ये व मालपाणी समूहाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

धामणगांव येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे अतिदक्षता कोविड सेंटर सुरु केले आहे. रुग्णाच्या उपचारासंदर्भाने मदत, अॅम्बुलन्स,

बेड व अती उपचाराच्या गरजेसाठी यशोधन कार्यालयातर्फे महेश वाव्हळ (९०७५०३७०३७) या नंबरवर हेल्पलाईन सुरु केली आहे, असे थोरात यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24