अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये अनेक कुटुंबातील नागरिक दुर्दैवी मृत्युमुखी पडले आहे.काहींचा आधारस्तंभ गेल्याने त्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे
यांना राज्य सरकारने खारीचा वाटा म्हणून ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तरी दुर्दैवी मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे आहे.
ही प्रक्रिया करत असताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी ऑनलाइन हेल्पलाइन सुविधा सुरु केली आहे.
ज्या कोणाचा कोविडमध्ये मृत्यू झाला आहे, अशा वारसांनी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.
याठिकाणी हेल्पलाइन सुविधा सुरु केली आहे. कोरोनामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवण्यासाठी मदत केली जाणारी ऑनलाईन प्रक्रिया येथे भरून घेतली जाणार आहे.