‘येथे’ मळीचे पाणी ओढ्यात; प्रदूषण वाढले, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील काही गावांत पावसाने शनिवारी सुपरनंतर जोरदार हजेरी लावली होती. शनिवारी 4 वाजेपासून जळगाव, चितळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला.

हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता. या जोराच्या झालेल्या पावसामुळे तालुक्यातील चितळी येथील डिस्टलरीचा बंधारा फुटला.

त्यामुळे डिस्टलरीतील मळीचे तसेच कॉलनीतील गटारीचे पाणी जळगाव येथील बंधार्‍यात आल्याने जळगाव येथील सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील सर्व बंधारे मळीच्या पाण्याने दूषित झाले आहेत.

त्यामुळे ओढ्याच्या कडेला असलेल्या रहिवाशांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान जळगाव ग्रामस्थांना नुकसान भरपाई न मिळाल्यास दि. 30 सप्टेंबरपासून कुठलीही

पूर्वसूचना न देता आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मळीच्या पाण्यामुळे शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीचे पंचनामे करून

त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी तसेच भविष्यात त्यांचे पिण्याचे पाणी दूषित झाल्यास या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24