नगर शहराला नाट्य व कलाक्षेत्राचा वारसा : आ. संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- युवकांना शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आपआपल्या आवडीच्या क्षेत्राम्ये जाऊन आपल्या कामाचा ठसा उमटविला पाहिजे.

नगर शहराला नाट्य व कला क्षेत्राचा वारसा आहे. हा वारसा आजच्या युवकांनी पुढे घेऊन जाण्याचे काम करावे. स्वप्निल मुनोत यांनी नाट्य कलाक्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला. मुनोत यास कला क्षेत्रातील सदाशिव अमरापूरकर पुरस्काराने नुकताच सन्मान मिळालेला आहे. हा पुरस्कार नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वप्निल मुनोत यांची या क्षेत्रामध्ये काम करण्याची आणखी वाढली आहे.

तसेच यश पंधाडे यांनी एलएलबी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. त्यांनी वकिली क्षेत्रातील मिळालेल्या पदवीपर्यंतच न थांबता कायद्याचा सखोल अभ्यास करुन या क्षेत्रातील कामाचा ठसा उमटवून समाजातील गरजूंना योग्य न्याय मिळवून द्यावा. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. कलाक्षेत्रातील सदाशिव अमरापूरकर पुरस्कार स्वप्निल मुनोत

यांना जाहीर झाल्याबद्दल तसेच यश पंधाडे यांनी प्रथम श्रेणीत एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा शहर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसच्यावतीने सत्कार करताना आमदार संग्राम जगताप. समवेत शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब जगताप, अभिजित खोसे, सारंग पंधाडे, वैभव ढाकणे, अभिजित पवार, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, सेहनवाज शेख, सोफियान शेख, अन्वर शेख, वसीम शेख, मारुती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसच्यावतीने मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. जगताप बोलताना म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची जनजागृती केली. इंग्रजांच्या विरोधात एक प्रकारचा लढा उभारला. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पहिल्या केंद्रीय मंडळात शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन शिक्षणात अमूलाग्र बदल केले.

देशात ते एक प्रभावी वक्ते म्हणून गणले जात होते. विविध भाषांचे ज्ञान त्यांना अवगत होते. अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी आ. संग्राम जगताप यांची राज्य सरकारच्यावतीने पंचायत राज व विधानमंडळ वेतनभत्ता समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24