अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. सगळीकडे या आजाराची दहशत आहे.
त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत.
राजस्थानमधील टोंक येथील भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया या खासदारांनी एक अजबच सल्ला दिला आहे. चिखलात आंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या सोशल मीडियात राजस्थानमधील टोंक येथील भाजप खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते यामध्ये चिखलात आंघोळ करत शंख वाजवताना दिसत आहेत.
तसेच, व्हिडिओमध्ये ते कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. रोग प्रतिकारशक्ती औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने रोग प्रतिकारशक्ती मिळेल.
तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी रोग प्रतिकारशक्ती वाढते, असे म्हणत आहेत.
कोरोना टाळण्यासाठी औषध खाण्याची नक्कीच गरज नसल्याचे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी म्हटले आहे. स्वत: सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी चिखलात आंघोळ करून आणि शंख वाजवून आपली प्रतिकारशक्ती वाढवल्याचा दावा केला
आहे. तसेच, सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगली पाने आणि कोरफड खाण्याचा सल्ला दिला. दरम्यान ,
काही दिवसांपूर्वी मंत्री अर्जुन मेघवाल पापड खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत काही दिवसांपूर्वी भाभीजी पापड या ब्रँडचं उद्घाटन करत असताना
मेघवाल यांनी भाभीजी पापड खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूशी लढण्यास मदत होते असं अजब विधान केलं होतं. या पापडांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल असं मेघवाल म्हणाले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved