अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- ऑक्टोबर महिन्यात ८८०० हजार रुपये प्रतिक्विंटल पोहोचलेल्या कापसाला आता घरघर लागली आहे. मागील ८ दिवसात तब्बल एक हजार रुपये दर कमी झाले आहेत. भावात घसरण सुरू झाल्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
अनेक परिसरात नगदी पीक म्हणून कापसाला पसंती दिली जाते. मात्र अतिवृष्टीमुळे जोमात आलेल्या कापसाला चांगलाच तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांनी प्रसंगी मोठा खर्च करून कपाशी पीक जगवले मात्र उत्पादनात प्रचंड घट आली.
त्यात कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांंना ते दहा ते पंधरा रूपये दर देऊन कापूस वेचून घ्यावा लागत आहे.ज्या ठिकाणी २५ क्विंटल कापूस व्हायचा तेथे केवळ दहा क्विंटल कापूस निघाला आहे.
दिवाळीच्या अगोदर खाजगी व्यापार्याकडून कापुस खरेदीला सुरुवात झाली. सुरुवातीला ६००० हजार रुपये प्रतिक्टिंंल खरेदी होणाऱ्या कापसाचे भाव ८८०० हजारापर्यत पोहोचले होते
त्यामुळे अनेक शेतकर्यानी भाव आणखी वाढेेल या आशेने कापुस घरातच साठवून ठेवला. मागील आठ दिवसात कापसाचे भाव चारशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले आहे . अगोदरच कापुस वेचायला मजुर मिळत नाही. त्यात भाव कमी झाल्याने शेतकरी नााराजी व्यक्त होत आहे.