रेशनवर आता मिळणार ‘हे’ मोफत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : राज्याचे सहसचिव सहसचिव मनोजकुमार सुर्यवंशी यांनी एक परिपत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे,

की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत यापुढे पाच किलो तांदळाऐवजी माणसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार्‍या केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दिनांक ९ जुलैच्या पत्रान्वये

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी मोफत वितरीत करावयाच्या अन्नधान्याचे नियतन प्राप्त झाले आहे.

अंत्योदय लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना यापुढे मोफत अन्नधान्य प्रति माणसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत.

माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी प्रति मानसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आलेला होता. करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजना नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति मानसी पाच किलो धान्य मोफत देण्यात येणार आहे.

त्यात मानसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय अन्नधान्य व्यतिरिक्त उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

दरम्यान, हे करत असताना कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावयाची असल्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनानुसार कोविड -19 आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतीय अन्न महामंंडळाच्या गोदामातून एकाचवेळी दोन महिन्याच्या अन्नधान्याची उचल करावी

तसेच लाभार्थ्यांना दोन महिन्याचे अन्न धान्य एकाच वेळेस वितरीत करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी आंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी

करीता अतिरीक्त नियतना नुसार अन्नधान्याचा साठामुक्त करण्याच्या सूचना भारतीय अन्न महामंडळास स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी ४ लाख २९ हजार ४४९ आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी २ लाख २६ हजार १६४ आहेत.

दोन्ही योजनांचे मिळून एकुण लाभार्थी ३० लाख ६९ हजार ५१३ आहेत. त्यानुसार जिल्ह्याला ९ हजार २०९ टन गहू आणि ६ हजार १३७ टन तांदूळ दिला जाणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24