अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही कोरोनाकचे रुग्ण वाढत चालले आहेत. काल दिवसभरात तालुक्यात 7 जण पॅाझिटिव्ह आढळून आले असून तालुक्यातील बाधितांची संख्या 73 वर गेली आहे.
यात शहरालगतच्या धुमाळवाडीत 7 वर्षाच्या मुलासह त्याची आईही पॅाझिटिव्ह निघाली असून बहिरवाडीत 3 तर पेंडशेत येथे 2 जण रुग्ण सापडले आहेत.
यात तालुक्यातील धुमाळवाडी येथील 7 वर्षीय मुलगा व आदिवासी भागातील पेंडशेत येथील 27 वर्षीय महिला, पेंडशेत येथील 81 वर्षीय पुरुष,
धुमाळवाडीतील 28 वर्षीय महिला तर बहिरवाडी येथील 90 वर्षीय व 42 वर्षीय महिला तर 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत 41 जण कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
सध्या 30 ऍक्टिव्ह पेशंट आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमणाची साखळी वाढतच चाललेली असल्याचे चित्र आहे.
एकूण रुग्णसंख्येने जिल्ह्यात २ हजारांचा टप्पा पार केला आहे. नागरिकांनी सलग राहून , सुरक्षेचे नियम पाळावे तसेच शक्य असल्यास घरातच थांबावे, गरजेचे असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com