अहमदनगर बातम्या

निळवंडेसाठी ज्यांनी कष्ट घेतले तो इतिहास विसरून चालणार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असतानाही फक्त निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर सातत्याने कामाला गती देऊन धरण व बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्ण केली.

अनेक वर्ष केलेल्या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले हा आनंदाचा क्षण आहे. पाणी आले, पण या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, तो इतिहास विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील लोहारे-मिरपूर येथे निळवंडे डाव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले, चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणासाठी ऐतिहासिक पाणी परिषद झाली. निळवंडे धरण हे या भागातील दुष्काळी जनतेसाठी आहे. अनेक वर्ष काम केल्यानंतर आज दुष्काळी भागात पाणी आले आहे.

हा शेतकऱ्यांच्या व आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. पिढ्यानपिढ्यांनी या पाण्याची वाट पाहिली आहे. आता यापुढे कायमच पाणी येणार आहे. पहिले रोटेशन असल्याने ओढाताण झाली. पण यापुढे सर्वांना पाणी मिळणार आहे. कालव्यांच्या वरच्या गावांमध्ये पाणी मिळण्यास काही अडचण आली, परंतु त्यावर मार्ग काढला जाईल.

आगामी काळात वितरिका लवकरात लवकर पूर्ण करून सर्वांना पाणी मिळेल, यासाठी काम होणे गरजेचे आहे. अनेक वर्षाचे कष्ट म्हणून पाणी आले. यामध्ये अनेकांनी योगदान दिले.

पुनर्वसित शेतकरी, अकोले तालुक्यातील शेतकरी यांचेही मोठे सहकार्य लाभले. कृती समितीने कालव्यांच्या मागणीसाठी मार खाल्ला. अनेक कष्टातून हे मोठे काम उभे राहिले आहे. त्यामुळे काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे.

यावेळी घोरपडे व पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उपसरपंच राहुल पोकळे यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. तर बाबासाहेब जोंधळे यांनी आभार मानले.

बाबासाहेब ओहोळ, मिलिद कानवडे, संपतराव गोडगे, कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे, प्रभाकर कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे, विजय रहाणे, निलेश शेळके,

विजय रणमाळे, दूध संघाचे संचालक संजय पोकळे, विनायक काळे, सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, राजेंद्र कहांडळ, संदीप कालें, डॉ. संदीप गोड़ें अरुण पोकळे उपसरपंच राहूल पोकळे,

प्रा. बाबा खरात, डॉ. संदीप पोकळे, बाबासाहेब पोकळे, आत्माराम जगताप, सुनील मुर्तडक, दिपाली वर्षे, बाबासाहेब जोंधळे, बाळासाहेब धात्रक, उत्तम रणमाळे, किसन रनमाळे, भडांगे, रामनाथ बोन्हाडे, योगेश पोकळे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24