अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- दिपावलीनिमित्त शालेय कामकाज बंद ठेवून शाळांना सुट्टी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्यावतीने देण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडित, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारुडकर, शरद दळवी, रोहिदास पांडे, उद्धव गुंड, बाबासाहेब शिंदे, विष्णू मगर, बाळासाहेब गाडेकर आदि उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सद्या शालेय कामकाज बंद आहे, परंतु ऑनलाईन, ऑफ लाईन शाळा सुरु आहेत.
तथापि दिपावली सण दि.11 ते 25 नोव्हेंबर 2020 दरम्यान असल्याने ऑनलाईन व ऑफ लाईन कामकाज बंद ठेवून या कालावधीत विद्यालयांना सुट्टी देण्यात यावी, तसेच नोव्हेंबर महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, अशी मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved