अहमदनगर बातम्या

अहमदनगर पुणे महामार्गालगत राळेगण सिद्धी फाट्यावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १९) पहाटे राळेगणसिद्धी फाट्याजवळ चारचाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवारी (दि.१९) माझे भाऊ मयत गणेश गुणवंत पवार (रा. ता. सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) व वाहनचालक जखमी राहुल लिंबाजी राठोड (रा. जरडी, छत्रपती संभाजीनगर) हे अशोक लेलण्ड कंपनीचे वाहन (क्र. एमएच १९ सीएक्स ०४२४ या गाडीने घरगुती सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जात होते.

त्यावेळी सकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान राळेगण सिद्धी फाट्याजवळ गाडी पंचर झाली म्हणून थांबून गाडी पंचर काढत होते. पंक्चर काढतेवेळी त्यांना नगरकडून पुण्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली.

पंचर काढत असलेल्या वाहनाला व तेथील मयत गणेश पवार व जखमी चालक राहुल राठोड यांना जोराची धडक बसल्याने यात गणेश पवार जागीच मयत झाले व राहुल राठोड गंभीर जखमी झाले अशी फिर्यादीने फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस स्टेशनचे संदीप पवार आपल्या सहकार्यासह व रुग्णवाहीका चालक शादीकभाई रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीना रुग्णालयात दाखल करून मयत व्यक्तीचा पंचनामा करत मृतदेह पुढील सोपसकर पूर्ण करण्यासाठी रुग्णालयात पाठवला.

सुपा पोलिसांनी डॉ. गोपाल पवार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कानगुडे पुढील तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office