अहमदनगर बातम्या

भरधाव कार अन इलेक्ट्रिक स्कुटीचा भीषण अपघात ; अपघातानंतर कारने चार पलट्या घेतल्या व थेट… !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भरधाव वेगात असलेल्या कारची समोर चाललेल्या इलेक्ट्रिक स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात इलेक्ट्रिक स्कुटीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

या कारचा इतका प्रचंड होता कि कारने इलेक्ट्रिक स्कुटीला जोरदार धडक दिल्यानंतर या कारने महामार्ग सोडून तीन ते चार पलट्या घेत थेट उसाच्या शेतामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात अक्षय लक्ष्मण पवार (रा. रायतेवाडी), धीरज गुंजाळ (पूर्ण नाव माहित नाही रा. खांडगाव) अशी जखमी झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर संगमनेर येथील एक खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव शिवारात उड्डाणपुलाच्या जवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने समोर चाललेल्या इलेक्ट्रिक स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या झालेल्या भिषण अपघातात इलेक्ट्रिक स्कुटीवरील २ जण जखमी झाले. कारचा वेग इतका प्रचंड होता या अपघातानंतर त्या कारने महामार्ग सोडून तीन ते चार पलट्या घेतल्या व थेट उसाच्या शेतामध्ये जाऊन कोसळली. दरम्यान आता जमावाची आपल्याला मारहाण होईल या भीतीने कारचालक कार सोडून पळून गेला.

ही घटना घडल्यानंतर सोमवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्या कारने अचानक पेटला असे पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण केले. अग्निशमक दलाच्या जवानांनी हि पेटलेली कार विझवली.

मात्र ही कार पेटली की पेटवली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. या अपघातात या अपघातात अक्षय लक्ष्मण पवार (रा. रायतेवाडी), धीरज गुंजाळ (पूर्ण नाव माहित नाही रा. खांडगाव) अशी जखमी झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.

त्यांच्यावर संगमनेर येथील एक खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास भान्शी हे पुढील तपास करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office