अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा नियोजन समितीत सर्वाधिक सदस्य हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. या विद्यामान जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळ संपत आला आहे.
जिल्ह्यात चालू महिन्यांत विधान परिषद आणि त्यानंतर जानेवारीत जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे सोमवारची जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमान सदस्यांची अखेरची बैठक ठरणार आहे.
दरम्यान या आयोजित बैठकीत पालकमंत्री किती आणि कसा निधी उपलब्ध करून देणार याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष राहणार आहे.
गेली दोन वर्षे जिल्हा नियोजन समितीतून सर्वाधिक निधी हा कोविड उपाययोजनांसाठी खर्च करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला निधीच मिळाला नव्हता.
गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रकोप कमी झाल्याने नियोजनमधून जिल्हा परिषदेला काही प्रमाणात निधी मिळालेला आहे. आता जिल्ह्यातून करोना हद्दपारीच्या मार्गावर असल्याने नियोजन समिती शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेला किती निधी देणार याकडे सदस्यांचे लक्ष राहणार आहे.