Bhandardara Dam : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील पाणीपातळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणामध्ये ९ हजार ८०८ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. आतापर्यंत भंडारदरा धरण ९० % भरले आहे. धरणाच्या पाणलोटात मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसुन आले.

धरणाच्या पाणीपातळीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी धरण ८३% झाले असताना पाणी प्रवरा नदीमध्ये विसर्जित करण्यात आले होते; मात्र काही दिवसांपासून पाणलोटासह परीसरामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने प्रवरा नदीमध्ये विसर्जित होणारे पाणी भंडारदरा धरण शाखेकडुन बंद करण्यात आहे.

भंडारदरा धरणातुन काही दिवसापुर्वी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढत असुन निळवंडे धरणामध्ये ६ हजार ४९९ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस कमी झाला असला तरी नदी-नाले ओसंडुन वाहत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढच होत आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भंडारदरा धरण भरत असते. या वर्षी भंडारदरा कधी भरते याकडे संपुर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

गेल्या २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ३० मीमी पावसाची नोंद झाली असुन घाटघर येथे ४४ मीमी, तर पांजरे ३७ मीमी, रतनवाडी ६७ मीमी तर वाकी येथे १९ मीमी पाऊस नोंदवला गेला.

वाकी बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असून १९७ क्युसेकने पाणी नदीपात्रामध्ये वाहत आहे. गत १२ तासामध्ये भंडारदरा धरणामध्ये १०८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९ हजार ८०८ दशलक्ष घनफूट झाला असुन धरण ८९ टक्क्यावर पोहचले आहे.