file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-   नेहमीच नागरी समस्येने ग्रासलेले व विकासाच्या दृष्टीने नेहमीच मागे असलेलं शेवगाव तालुका हा नेहमीच समस्यांच्या विळख्यात असतो.

यातच वर्षाचे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना तालुक्यातील नागरिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात गेली आठ दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिक वीज वितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळाच्या कामकाजामुळे हैराण झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, शेवगाव शहरातील खंडोबानगर, वरूर व आखेगाव रस्ता परिसर विजेअभावी गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंधारात आहे.

इतर भागातही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली दिवसभरातील अनेकवेळा तसेच रात्री सुद्धा बीज गायब राहत असल्याने शहरातील नागरिक व छोटे व्यावसायिक यांच्यापुढे अनेक अडचणींचे सावट उभे राहिले आहे.

महावितरणचे निष्क्रिय कर्मचाऱ्यांचा नागरिकांना त्रास… महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन कायम नॉट रिचेबल राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत असल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान आगामी दसरा दिवाळीच्या मोठ्या सणावाराचे दिवस लक्षात घेता वीज वितरण कंपनीने शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

नागरी समस्यांबाबत लोकप्रतिनिधीमध्ये उदासीनता शेवगाव तालुक्यात नागरी समस्यां या कायमच असतात. मात्र या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेताना दिसून येत नाही.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो व इतर समस्या लोकप्रतिनिधी या समस्यांबाबत नेहमीच उदासीन असल्याची जनभावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.