अहमदनगर बातम्या

सरकारच्या हिट अँड रन’ कायद्याला कंटाळून ट्रक चालकाची आत्महत्या पोलिसांना मात्र वेगळाच संशय

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याला देशात मोठा विरोध केला जात असतानाच या कायद्याला कंटाळून एका ट्रक चालकाने थेट आत्महत्याकेल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.

नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील ट्रक चालकाने भेंड्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मयताच्या खिशात आढळली आहे. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलकुडगाव येथील ट्रक चालक भाऊसाहेब विश्वनाथ थोरात यांचा मृतदेह भेंडा ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगार वसाहातीतील झाडाला गळफास घेतल्याचे अवस्थेत आढळून आला. त्यांच्या खिशात आधार कार्ड व एक चिठ्ठी आढळून आली.त्या चिठ्ठीत लिहिले आहे की, केंद्र सरकारने केलेल्या ड्रायव्हर विरोधी कायद्याला आपण कंटाळलो आहे.

अपघात झाल्यास १० वर्षे शिक्षा व ७ लाख रुपये दंड, असा कायदा केला आहे. आपण नॅशनल हायवेवरील एक ट्रक ड्रायव्हर असून माझी घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. पत्नी व मुले सणासाठी माझी वाट पाहत आहेत; परंतु माझ्याकडे पैसे नाहीत. वारंवार प्रयत्न करून मला रेशनकार्ड मिळाले नाही.

माझा एक मुलगा मतिमंद असून त्याला शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही ड्रायव्हरने कसे जगावे. पैसे नसताना आपण इंदौरवरुन इथपर्यंत आलो. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका, असा उल्लेख चिठ्ठीत आहे.

माझे वडील फार शिकेलेले नाहीत, या चिठ्ठीतील हस्ताक्षर माझ्या वडिलांचे नसून ती चिठ्ठी दुसऱ्या कोणी तरी लिहिली असावी, असा संशय मयताच्या मुलाने पोलिसांकडे व्यक्त केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office