अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८८ टक्के आहे. दरम्यान जिल्ह्यातील ९० कोरोनामुक्तांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
तसेच गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत १११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ११०१ इतकी झाली आहे. नव्याने कुणाचाही मृृत्यू झाला नाही.
रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३, खासगी प्रयोगशाळेत ६६ आणि अँटीजेन चाचणीत २२ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा १३, नगर ग्रामीण २, पाथर्डी १, श्रीगोंदे २ रुग्णांचा समावेश आहे.