आमदार रोहित पवारांकडून माणुसकीच दर्शन… अपघातग्रस्ताला पाठवलं स्वत:च्या गाडीनं रुग्णालयात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच त्यांच्या अनोख्या कामामुळे चर्चेत राहत असतात. जनमानसातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांच्या माणुसकीचे अनेक उदाहरण आजवर आपण पहिले आहे. असेच एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. रोहित पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वज यात्रा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाली होती.

ही स्वराज्य ध्वज यात्रा पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे परिसरात आली होती. त्यावेळी रस्त्यावर एक अपघात झाल्याची माहिती रोहित पवार यांना मिळाली. त्यावेळी रोहित पवार यांनी अपघातातील जखमींसाठी स्वत:च्या ताफ्यातील गाडी दिली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, रोहित पवार स्वराज्य ध्वज यात्रेसोबत होते. ही यात्रा पंढरपूर तालुक्यातील गुरसाळेपर्यंत आली होती. त्यावेळी रस्त्यावर एक अपघात झाल्याची माहिती रोहित पवारांना मिळाली.

एका परप्रांतिय मजुराचा अपघात झाल्याची माहिती मिळताच रोहित पवार यांनी स्वत:च्या गाडीतून जखमी तरुणाला उपचारासाठी पंढरपूरच्या विठाई रुग्णालयात पाठवलं.

या युवकावरील उपचाराचा खर्चही रोहित पवार करणार आहेत, तशी माहिती पवारांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या घटनेतून रोहित पवार यांच्यातील माणुसकीचं दर्शन घडलं.