आमदार मोनिका राजळे यांनी ऊस दराबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे, त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला. त्यांनी पैठण ते तिसगाव रस्त्यासाठी २१५ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. घोटण सारख्या गावात तब्बल दहा कोटी रुपयांची विकास कामे केली, त्या ज्या बोलतात ते करतात त्यामुळे, या परिसरातील नव्हे तर तालुक्यातील शेतकरी त्यांच्या मागे ठाम उभा राहतीलअसा विश्वास शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी अनेक युवकांनी आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये पक्ष प्रवेश करतांना विकासाच्या बाजूने उभा राहणार असल्याचे सांगितले. बुधवारी तालुक्यातील तळणी, बाभूळगाव, घोटण, अंतरवाली, खानापूर, कऱ्हेटाकळी, एरंडगाव, लाखेफळ, दहिफळ जुने, नवीन, बोडखे , ताजनापुर, खुंटेफळ, दादेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी घोटण येथे भोसले मेजर बोलत होते. पुढे बोलताना,आगामी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहून मतदारसंघातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत ऊसाला उच्चांकी दर देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सभाजी लेंडाळ, अनिल लेंडाळ, अमोल जगधने, अक्षय क्षीरसागर,
सलिम शेख, असिम शेख, दत्ता वल्ले, लक्ष्मण मोटकर, विशाल मोटकर, अमोल मोटकर, करण गायकवाड, योगेश क्षिरसागर, वैभव काकडे, तुकाराम कुलट आदींसह अनेक युवकांनी आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी लक्ष्मण टाकळकर, संजय टाकळकर, संजय परदेशी, अनिल कटारिया, पीरमोहम्मद शेख, तुका नाना थोरवे ,भाऊसाहेब क्षिरसागर, संजय क्षिरसागर, राजू तात्या घुगे, राजेंद्र घुगे, लक्ष्मण सुभाष मोटकर, अमोल मोटकर आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे यांनी ऊस दराबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे, त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला. त्यांनी पैठण ते तिसगाव रस्त्यासाठी २१५ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. घोटण सारख्या गावात तब्बल दहा कोटी रुपयांची विकास कामे केली, त्या ज्या बोलतात ते करतात त्यामुळे, या परिसरातील नव्हे तर तालुक्यातील शेतकरी त्यांच्या मागे ठाम उभा राहतीलअसा विश्वास शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले यांनी व्यक्त केला.खानापूर येथे बोलतांना शेतकरी नेते रावसाहेब लवांडे यांनी बोलतांना शेतकरी अडचणीत असताना वृद्धेश्वर वगळता, काहींनी ऊसाचे पेमेंट दिले नाहीत. तर एकाने अर्धवट पैसे जमा केले. शेतकऱ्यांचे हिताचे कोण हे ओळखले पाहिजे. गत दहा वर्षातील आमदार मोनिका राजळे यांच्या काळातील विकास कामे ठळक पणे दिसत आहेत.
मात्र त्यांच्या त्यांच्या काळातील विकास कामे दिसतं नाहीत. शेवगावला मॉडेल सिटी बनवू असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात साधी एक मुतारी त्यांना बांधता आली नाही. ते आज विकासाच्या गप्पा मारत असून कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता शेतकरी हिताचे व गावच्या विकासाच्या विकासाच्या बाजूने आपल्याला जायचे आहे असे लवांडे पाटील म्हणाले.
तर आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात गावात व परिसरात केलेल्या विकास कामाचा आढावा घेत, शेतकरी व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने सर्वाधिक मताने विजयी होणार असल्याचे सांगितले.