अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पतीने पत्नीला अॅसिड टाकून संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश आनंद वाघचौरे (रा. डॉक्टर कॉलनी, सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुरेखा निलेश वाघचौरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
रविवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादीच्या राहत्या घरी ही घटना घडली. आरोपी निलेश वाघचौरे फिर्यादी सुरेखा वाघचौरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता.
त्यांनी पैसे न दिल्याने आरोपी शिवीगाळ करून तुझ्या नोकरीचा रुबाब मला दाखवू नको, मी तुला अॅसिड टाकून संपवून टाकील अशी धमकी दिली.
तसेच लोखंडी गजाने मारहाण देखील केली. फिर्यादीच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार रणजित बारगजे या प्रकरणाचा तपास करत आहेत.