अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : ग्रामपंचायत कारभारात पतीचा हस्तक्षेप, अखेर त्या महिला सरपंचावर अविश्वास ठराव !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : तालुक्यातील राजापूर येथील लोकनियुक्त महिला सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्याविरुद्ध सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलच्या १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे,

ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप यासारख्या विविध कारणावरून श्रीगोंदा अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे दि.९ रोजी दुपारी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला.

तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त महिला सरपंच आणि १२ सदस्यसंख्या असून लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे,

ग्रामपंचायतीच्या मीटिंग वेळेवर तसेच सदस्यांना विश्वासात न घेता करणे, सदस्यांना विचारात घेऊन कामकाज न करणे तसेच महिला सरपंच असल्याने संपूर्ण ग्रामपंचायत कारभार हा सरपंच पती धनंजय मेंगवडे पाहत असल्याचा आरोप करत

पाडळे शंकर सावळेराम, थेऊरकर दिलीप कांतीलाल, मोरे कालिकाबाई बाळू, वीर कमल दादाभाऊ, ढवळे रतन बाबासाहेब, वाखारे अशोक शिवाजी, धावडे रमेश लहानू, गव्हाणे छाया अनिल,

धुळे विमल अंकुश, भंडारे आबासाहेब कारभारी, चौधरी नलिनी सचिन, घावटे नीलम चंद्रकांत या १२ ग्रामपंचायत सदस्यांनी श्रीगोंदा अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे दि. ९ रोजी दुपारी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला आहे.

या प्रकरणी अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांनी सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ठरावावर चर्चा करण्यासाठी तसेच निर्णय घेण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कलम ३५ (२) नुसार राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे.

Ahmednagarlive24 Office