अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :आमदार रोहित पवार यांनी नुकताच नगर दौरा केला होता. कोरोनाच्या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला होता. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष असल्याचा दावा केला होता.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व कोरोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना या आरोपाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मी डॉक्टर आहे. मला तर व्हेंटिलेटरबाबत तसे काहीच वाटले नाही.
व्हेंटिलेटर सदोष असल्याचे ते कोणत्या निकषावर बोलत आहेत? त्यांच्याकडे तसा काही अहवाल आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उलट ग्रामीण भागामध्ये जेवढे व्हेंटिलेटर आहेत, ते केंद्र सरकारच्या निधीतील असून ते लावल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आमच्यापर्यंत आली नसल्याचेही विखे यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews