MP Sujay Vikhe : आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सर्व परिस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिली.
आपण केंद्रीय मंत्री शहा यांची भेट घेतल्याने अडाणी विरोधकांनी माझ्यावर टीका केली, पण शहा हे केवळ गृहमंत्री नाहीत, तर समितीचे अध्यक्ष आहेत.
त्यामुळे त्यांची भेट घेऊन मी समस्या मांडली. मी डॉक्टर आहे. कोणत्या आजारावर कोणाला भेटायचे, हे मला मला समजते.
विरोधकांचा तेवढा अभ्यास नाही. आपल्या भेटीनंतरच कांदा निर्यातीबंदीचा निर्णय मागे घेण्याचा आल्याचा दावा करीत खा. डॉ. सुजय विखे यांनी आता कांद्याला चांगला भाव मिळणार असल्याचेही सांगितले.
पारगाव फाटा येथील खासगी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी वर्गातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
समितीचे कार्यकारी संचालक शुभम वाडगे, व्यवस्थापक शिवाजी भोस, व्यापारी संजय पोखरणा आदींच्या हस्ते खा. विखे यांचा सत्कार करण्यात आला.
बाजार समितीमधील व्यापारी संजय पोखरणा यांनी कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी, व्यापारी वर्गात चिंता होती. मात्र, निर्यात बंदी उठवण्यात आल्याने बाजारात उत्साह असून, पहिल्याच दिवशी प्रति क्विंटलमागे १ हजार रुपयांची वाढ झाली.
पुढील लिलावात भाव वाढतील, बाजारात उत्साह राहील, असे सांगून व्यापाऱ्यांनी खा. डॉ. विखे यांचे आभार मानले कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी वर्गात नाराजी असून, त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.
खा. विखे यांनी त्यावर तोडगा काढला, तसेच तालुक्यातील विविध प्रश्न सोडवल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी आभार मानले. बाळासाहेब गिरमकर, शहाजी हिरवे, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
डिंभे बोगदाही मार्गी लावणार
आपण एमआयडीसीबाबत दिलेला शब्द पूर्ण केला. एमआयडीसी होणारच, तसेच साकळाई जलउपसा सिंचन योजनाही आम्हीच पूर्ण करू, डिंभे बोगदाही मार्गी लावणार आहोत.
कांदाप्रश्न सुटल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. चैतन्य बाजार समितीच्या रूपाने श्रीगोंदे तालुक्यातील हा पहिला सत्कार असल्याचेही विखे म्हणाले.