राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते. पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही. एकही योजना जिल्ह्याला आणता आली नाही. आज बोलघेवडे पुढारी येऊन करीत असलेल्या टिकेला मी घाबरत नाही. त्यांचे योगदान तरी काय? तुमच्या आशीर्वादाने मतदार संघाचा विकास पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
महसूल पंधरवडानिमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे महसूलमंत्री विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब जेजुरकर, मुकुंदराव सदाफळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व शिधापत्रिकेचा प्रत्येकी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. कृषी विभागाच्या ११ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी पोलिस विभागात शासन नियुक्ती मिळालेले स्थानिक युवतींचा व सीए परीक्षा पास झालेल्या युवकाचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महसूलमंत्री विखे म्हणाले, एका सप्ताहात योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
पशुसंवर्धन पंधरवडा ही साजरा करण्यात येत आहे. या महसूल पंधरवड्यात महसुली दाखल्यांचे सर्वसमान्यांना प्रभावीपणे वितरण करण्यात येणार आहे. महायुती संघर्षही झाला. न्यायालयीन लढाई केली. आज गावागावात येवून बोलणारे तेव्हा कुठे होते? शेती महामंडळाच्या जमिनी मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
औद्योगिक वसाहत होत असल्याने डिफेन्स क्लस्टरचा मोठा प्रकल्प येत असून तालुक्यातील दोन हजार युवकांना रोजगार निर्माण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री क्योश्री योजनेच्या कामास जिल्ह्यात सुरुवात आली. मुख्यमंत्री क्योश्री योजनेचे अर्ज या मेळाव्यात भरण्यात आले. या योजनेची गटविकास अधिकारी पठारे यांनी माहिती दिली.
१७२६३ शेतकऱ्यांना ९.४४ कोटींचे दूध अनुदान दिले
तालुक्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना वकृषी विभागाच्या १२०० लाभाथ्यर्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ७६ कोटी ३३ लाखांचा लाभ वितरित करण्यात आला. १७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान दिले. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनेत ५४ हजार महिलांचे अर्ज
जिल्ह्यात १८९ तलाठ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राहाता तालुक्यात ५४ हजार अर्ज भरण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांचे टक्के वीज बील माफ केले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला. धरण भरल्याने कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे,