मला जीवे मारण्याचं षडयंत्र होत, त्यांच्या यंत्रणेतून फोन आला आणि मी रस्ता बदलला, नाहीतर….; डॉ. सुजय विखे पाटील यांचा मोठा आरोप

Pragati
Published:

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात विखे अन थोरात यांच्या राजकीय संघर्षाची चर्चा सुरू आहे. थोरात आणि विखे यांचा राजकीय संघर्ष हा काही नवा नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाला अधिक धार आली आहे.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे सुजय विखे पाटील यांची जाहीर सभा होती. या जाहीर सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. यानंतर विखे आणि थोरात यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खरेतर, या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध होत आहे.

भारतीय जनता पक्षासहित महायुती मधील सर्वच पक्षांनी या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः सुजय विखे पाटील यांनी सुद्धा या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. पण, या विधानानंतर संगमनेर मध्ये जाळपोळ झाल्याची घटना समोर आली.

संतप्त जमावाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पोस्टरला काळे फासत त्यानंतर वाहनांची जाळपोळ केलीये. दरम्यान आता सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर मोठा आरोप केला आहे. काल, शनिवारी 26 ऑक्टोबरला सुजय विखे यांनी आपल्याला मारण्याचा हा पूर्वनियोजित कट होता असा गंभीर आरोप केलाय.

ते म्हणालेत की, माझ्या व्यासपीठावर एका व्यक्तीने अशा प्रकारची खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचा मी निषेध करतो. प्रशासनाने त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारच्या संस्कृतीला महायुती आणि विखे पाटील परिवार पाठीमागे घालणार नाही.

अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे. मात्र अशा प्रकारच्या घटनेनंतर मी व माझे कार्यकर्ते ज्या रस्त्याने जाणार होते त्या ठिकाणी रॉकेल व पेट्रोल घेऊन जवळपास 200 ते 300 लोक होते. ही माहिती मला त्यांच्याचं यंत्रणेतून मिळाली. तसेच वाहने जाळणारे इतर कोणी नव्हते तर स्थानिक आमदारांचे बंधू होते.

त्यांचे स्वीय सहाय्यक, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य हे होते. त्यांनीचं ही जाळपोळ घडून आणली असा आरोप विखे यांनी यावेळी केला. तसेच या प्रकरणाचे फोटोज आणि व्हिडिओज देखील समोर आहेत यामुळे या दोषींविरोधात देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe