अहमदनगर जिल्ह्याला आजवर अनेक अधिकारी मिळाले. यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी रुटीनवर्क करत काम केलं. परंतु काही अधिकारी मात्र अहमदनगर जिल्ह्याच्या कायमचे लक्षात राहतील. कारण यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी फार मोठे योगदान आपल्या कामातून दिले आहे.
उदाहरण जर पाहायचे झाले तर तत्कालीन एसपी कृष्ण प्रकाश असतील किंवा विश्वासराव नांगरे पाटील असतील. यातच एक महिला अधिकारी अर्थात IAS रुबल अग्रवाल यांनी आपला अहमदनगर जिल्ह्यात आपला कार्यकाळ गाजवला. आपल्या कामाने चांगला ठसा त्यांनी उमटवला. त्यांनी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी निभावली आहे.
त्यांच्या कामकाजाच्या नियोजनाचा मोठा फायदा संस्थानला झाला होता. त्यानंतर त्यांनी पुणे महापालिकेत धडाकेबाज निर्णय आणि अंमलबजावणी करत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या या कामाची दखल घेत मुंबई मेट्रोचे ‘कंट्रोल’ आता त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
त्यांची ‘एमएमआरडीए’तील अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली असून मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता अग्रवाल यांच्या हाती प्रशासन आल्याने मुंबई मेट्रो आता आणखी ‘फास्ट’ होईल अशी अपेक्षा सामान्यजन व्यक्त करत आहे. त्या 2008 बॅचच्या ‘आयएएस’ अधिकारी असून मागील 15-16 वर्षांपासून राज्यात काम करत असताना रुबल अग्रवाल यांनी वेगवेगळ्या खात्यांत काम केले.
अहमदनगर व जळगावातील कामगिरी गाजली
अग्रवाल यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पहिले आहे. प्रचंड आक्रमकपणे प्रशासकीय यंत्रणेत बदल घडवून बड्या राजकारण्यांना वठणीवर त्यांनी त्यावेळी आणले होते त्यामुळे त्यांची तेथे जिल्हाधिकारी म्हणून कारर्कीद गाजली.
अहमदनगरमध्ये शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात संस्थानने आखलेल्या चांगल्या परंतु काही कारणास्तव रखडलेल्या योजनांना पुन्हा रन केले.
त्यांच्या कामामुळे मोठा फायदा संस्थानला झाला होता. 2019 मध्ये अग्रवाल यांची पुणे महापालिकेत PMC अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाल्यानंतर तेथेही विशेषतः कोरोना काळात त्यांनी खूप मोलाची व उल्लेखनीय कामगिरी केली होती.