१० पेक्षा अधिक रुग्ण असल्यास ‘या’ तहसीलदारांनी घेतला ‘हा’ निर्णय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा लक्षात घेता राहात्याच्या तहसीलदारांनी १०पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या

गाव किंवा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेश येईपर्यंत सर्व आस्थापना व व्यवहार सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे.

कोरोनाचे अनलॉकनंतर राहाता तालुक्यात सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले होत; मात्र राहाता तालुक्यात रुग्ण संख्या वाढल्याने पुढील आदेशापर्यंत बाजारपेठ संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी तालुक्यात खबरदारी म्हणून हा निर्णय अनेक ठिकाणी घेण्यात येत आहे. तर सर्व व्यावसायिक, दुकानदारांनी दुकानात काम करणारे कर्मचारी व स्वत:ची कोरोना आरटीपीसीआर चाचणी दर पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जर आरटीपीसीआर चाचणी केलेली नसेल, स्वत:च्या जवळ चाचणी अहवाल नसेल, तर ते दुकान सील करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

शासकीय कार्यालयामध्ये चाचणी अहवाल असेल, तरच कार्यलयात येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. धार्मिक स्थळ या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे, इत्यादी प्रकारचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार व जनावरांचा बाजार बंद राहील, असेही आदेशात म्हटले आहे.