घोटी-इगतपूरी नाशिक भागात पाऊस ओसरला कोपरगाव नाशिक, घोटी, इगतपूरी व धरण कार्यक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. दारणा, भावली व कडवा धरणातून गोदावरी नदीत १५ हजार ६५१ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणात ८२.६१ टक्के पाणीसाठा झाला तर भाम आणि भावली धरणे पुर्णपणे भरले आहे. तर भाम धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.
(दि.२५) जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मिलीमिटरमध्ये तर कंसातील आकडे एकुण पावसाचे आहेत. दारणा २२ (५२६), मुकणे ३३ (६१६), वाकी ४६ (९९७), भाम ६० (१४१९), भावली ९४ (१९१८), वालदेवी ६१ (४११), गंगापूर २७ (६२०), काश्यपी १६ (५८०), गौतमी २९ (६२६), कडवा १३ (३०७), आळंदी १० (३७०), पालखेड १ (१४७), करंजवण ६५ (४५०), वाघाड १४ (३२४), नांदूर मध्यमेश्वर ४ (१५२), नाशिक १० (३७६), घोटी ५४ (८२२), इगतपूरी ९३ (१२०८), त्र्यंबकेश्वर ४२ (९५१), देवगाव २ (२५५), ब्राम्हणगाव ० (२८१), कोपरगाव २ (२१५), पढेगाव ० (२५), सोमठाणे (२०९), कोळगाव २(२४०), सोनेवाडी ३ (१६२), शिर्डी २ (२३४), राहाता ३ (१७३), रांजणगाव खुर्द ४ (२१४), चितळी ६ (१९९), याप्रमाणे पाउस झाला आहे.
धरणातील पाणीसाठा टक्के, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये पुढीलप्रमाणे दारणा ८२ टक्के (५९०६ दलघफु), मुकणे २९ टक्के (२१५७), वाकी ३७ टक्के (९३३), भाम ९२ टक्के (२४६४), भावली १०० टक्के, (१४३४), वालदेवी ५८ टक्के (६६८), गंगापूर ५४ टक्के (३०५६), काश्यपी २६ टक्के (४९३), गौतमी ५२ टक्के (९८६), (१६१८), कडवा ९५ टक्के आळंदी १९ टक्के (१५६), पालखेड ३२ टक्के (२१३), असा पाणीसाठा आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी कालव्यांना पाण्याचे आर्वतन सोडण्यात आले आहे. २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये सध्या गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आहे. यंदा पर्जन्यमान उशिराने होत असल्याने ही धरणे भरतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. बळीराजा अजुनही चिंतेत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने त्याच्या विहीरींना पाणी अद्यापही उतरलेले नाही, त्यामुळे खरीपाबरोबरच अगामी रब्बी हंगाम अनिश्चितेच्या भोवऱ्यात आहे.
दरम्यान, बारमाही गोदावरी कालवे समन्यायीमुळे आठमाही झाले आहेत. मेंढेगिरी समितीच्या शिफारशी या कालव्यांच्या मुळावर असल्याने याभागातील शेती व्यवसाय व त्यावर अवलंबून असणारी संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळांच्या बागा केंव्हाच तोडून टाकल्या आहेत.