अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-शहरातील नागरिकांना सर्व मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते. मात्र जर नागरिकांच्या सुविधांसाठीच सत्तेत असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीवरच उपोषण करण्याची वेळ आली आहे.
जर विद्यमान सभापती उपोषण करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी आता काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विद्युत साहित्य मिळत नसल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे लोकवस्ती वाढत आहे. त्या भागात लाईटचे दिवे बसविणे नगरसेवकाचे कर्तव्य आहे.
परंतु मनपाच्या पोलवरील पथदिवे बंद आहेत. नागरिक वारंवार नगरसेवकांना लाईट बसवण्याची मागणी करित आहेत. नागरिकांना कुठपर्यत उडवा उडवीची उत्तरे द्यावीत,
मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नगरसेवकांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यासर्व बाबींच्या निषेधार्थ मनपाच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर हे आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करत आहेत.
पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचा फायदा घेवून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार प्रशासनाला सांगूनही विद्युत साहित्य मिळत नाही. स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याची निविदा प्राप्त झाली आहे.
परंतु विद्युत विभागाला पूर्णवेळ अभियंता नसल्यामुळे निविदा उघडण्यास विलंब होत आहे. प्रशासनावर मा.आयुक्त यांचा धाक नसल्यामुळे कोणीही विद्युत विभागाचा पदभार घेत नाही.
जो पर्यत विद्युत विभाग प्रमुख व विद्युत साहित्य मिळणार नाही तो पर्यत आयुक्त यांचे दालनासमोर उपोषण सुरूच ठेवनार असल्याचे कोतकर यांनी सांगितले.