आढळून आलेल्या ‘त्या’ पाऊलखुणा बिबट्याचे नाही तर..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त पसरले होते.

मागील दोन दिवसांपासून श्रीगोंदा मांडवगण परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सामाजिक माध्यमातून सर्वत्र चालू होती. मात्र, या पाऊलखुणा बिबट्याच्या नसून, तरसाच्या असल्याचे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे.

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती अशी कि, बिबट्याच्या पाऊलखुणा ह्या चौकोनी असतात. बिबट्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

श्रीगोंदा शहरांमधील मांडवगणरोड वरील एका हॉटेल जवळच्या पुलावरून एका ट्रक ड्रायव्हरने श्रीगोंद्याच्या दिशेने जात असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाल्यासारखे वाटले. याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली.

घटनास्थळी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना रात्री तसे आढळून आले नाही. मात्र, आज वन विभागाने पाहणी केली असता, बिबट्याचे ठसे नसून, तरसाच्या पायाचे ठसे असल्याचे निदर्शनास आले.

संबंधित परिसराची पाहणी केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यामधील जनतेला घाबरून जाऊ नये, रात्री – अपरात्री घराबाहेर फिरू नये, आपल्या घरच्या व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24