अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील स्टेशन रोड वरील लोखंडी पुलशेजारिल नविन पुलाचे काम 4 वर्षा पासुन चालु असुन अजुन पर्यंत ते पुर्ण झालेले नाही मनसे च्या वतीने खुप निवेदने महानगरपालिका पालिका आयुक्तांना दिली.
परंतु कामास विलंब होत आहे. नविन पुला खलील मातीचा भराव अजुन पर्यंत ठेकेदार व अधिकारी यांना वारंवार सागुंन सुध्दा काढलेला नाही या पावसाळ्यात नदीला पाणी येऊन पानी वाहण्यास या भरवचा अनेक वेळा अडथळा निर्मान झाला. पुलाच्या साईड कठद्याचे काम पुर्ण झालेले नाही त्यामुळे जर अपघात झाला तर याला जबाबदार कोन.
हा सवाल मनसेच्या वतीने विचारण्यात आला असुन . या कठद्यानचे काम पुर्ण नाही झाल्यामुळे शेजारी स्मशानभुमी मध्ये जाण्याच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. कोरोनच्या संसर्गात जागा उपलबध होत नसल्यामुळे या स्मशानभुमी मध्ये जास्त अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
परंतु पुलाचे अर्धवट कामामुळे हा स्मशानभुमी कडे जाणार रस्ता खराब होऊन.शेवाळ जमा झाल्यामुळे अनेक नागरिक या रस्त्यावरुन व स्मशानभूमीत पडत आहेत. या सर्व प्रकाराला संबधित ठेकेदार व अधिकारी जबाबदार आहेत पुलाच्या कामाची काल मर्यादा संपून 3 वर्ष झाले
तरी हे काम पुर्ण नसल्यामुळे स्थनिक नागरिकांना या सर्व समस्येला समोरे जावे लागत आहे.या आधी सुध्दा या पुलाचे 3 वर्षापूर्वी बंध पडलेले काम मनसेच्या पाठपुरावा करण्यात आला त्यामूळे पुन्हा सुरु झाले 15 ऑगस्ट 2019 रोजी रोजी या पुलाचे काम पुर्ण करनार अशी घोषणा करणारे
महापौर पुन्हा या कडे फिरकलेच नाहीत अजुन या पुलावरील लाईट पोल बसविन्याचे काम सुरु पुर्ण झालेले नसुन हे सर्व अपूर्ण कामे ठेकेदाराने तातडीने पुर्ण करावेत अन्यथा मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते संबधित ठेकेदार व अधिकारी यांना15 दिवसानंतर पुलावरच बांधुन ठेवतील याची नोंद घ्यावी असा ईशारा या पत्रकाद्वारे मनसेचे नितीन भुतारे यां नी दिला.
अनेक निवेदने देऊन प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे हेच प्रसिध्दी पत्रक निवेदन म्हणुन समजावे व योग्य ती दखल घ्यावी अशी विनंती मनसेच्या नितीन भुतारे यानी मनसेच्या वतीने केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved