विजय मकासरे यास पोलिसांनी अटक न केल्यास आंदोलन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे हल्ला प्रकरणातील आरोपी विजय मकासरे यास राहुरी पोलिसांनी अटक न केल्यास छावा संघटना नगर जिल्हा व मराठा एकीकरण समितीच्या वतीने पूर्व सूचना न देता आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हाध्यक्ष नितिन पटारे यांनी दिला आहे.

या मागणीचे निवेदन सोमवारी राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना देण्यात आले. यावेळी देवेंद्र लांबे, रमेश म्हसे, सुनील निमसे, नितिन कल्हापुरे, संदीप गिते, राजेंद्र लबडे, अविनाश क्षीरसागर,

विक्रम गाढे,विनायक बाठे,सतीश घुले,आबासाहेब लहारे, रणजित चव्हाण, अमोल पावर, दीपक चव्हाण,सागर पाटील, किशोर मोरे,विजय पवार, सचिन घाडगे,अक्षय कोहकडे, सागर ताकटे,

मयूर कल्हापुरे उपस्थित होते. छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्यावर ६ ऑगस्टला राहुरी टाकळीमिया रस्त्यालगतच्या नंदणी हॉटेल जवळ

लांबे यांची दुचाकी मोटरसायकल अडवून विजय मकासरे व त्याच्या साथीदाराने डोक्याला कट्टा लावत २५ हजारांची रोख रक्कम व अंगठी लंपास करत जिवे मारणे,धमकी दिल्याच्या लांबेच्या फिर्यादीवरून मकासरे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.