विसापूर धरणात पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांसह नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको : आण्णासाहेब शेलार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी कष्टाने जगवलेली पिके व फळबागा जळुन जाण्याच्या मार्गावर असल्याने सध्या सुरू असलेल्या कुकडीचे ओव्हर फ्लो आवर्तनातून विसापूर धरणात पाणी सोडावे. यासाठी माजी जि.प. उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी आग्रही मागणी करत,

शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी विसापूरचे आवर्तन सोडा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा देत येत्या चार दिवसात विसापूर धरणात पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांसह नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे शेलार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले.

कुकडीचे ओव्हर फ्लो आवर्तन सध्या चालू असून तालुक्यात काही ठिकाणी गरज नसताना पाणी चालू असल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. मात्र विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी, शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना, प्रशासन ओव्हर फ्लो चे पाणी देण्यास सुद्धा उदासीनता दाखवत आहे. ऑगस्ट संपत आला तरी पाऊस नाही,

त्यामुळे प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचा फळबाग पिकांचा व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न याचा विचार करून लवकरात लवकर कुकडीचे चालू आवर्तनातून विसापुर तलावात पाणी घेऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी विसापुरचे आवर्तन सोडावे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष लोकनेते आण्णासाहेब शेलार यांनी दिला आहे.