उंबरठ्याच्या बाहेर गेलात तर कोरोनाची लागण झाली असे गृहीत धरा….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव :- शहरात कोरोनाचा रूग्ण सापडल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून कोरोना कुठल्याही क्षणी आता ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात प्रवेश करु शकतो.

याची जाणीव ठेवून नागरिकांनी गाफीलपणा सोडून सतर्क होवून घरात बसनेच हिताचे राहील. कोपरगाव तालुक्यात करोनाची बाधा नव्हती पण आता कोपरगाव शहरात करोनाचा रुग्ण सापडला आहे.

खेडेगावात करोना येणार नाही म्हणून नागरीकांनी गाफील राहू नये.आता आपल्या गावात आपल्या घराच्या उंबरठ्यावर कोरोना येऊन ठेपला आहे. म्हणून नागरीकांनी घरातील उंबरठ्याच्या बाहेर गेलात तर कोरोनाची लागण झाली असे गृहीत धरा.

कोरोना विदेशातून आपल्या देशात आला. देशातुन राज्या राज्यात पसरत जिल्ह्यात पोहचला आता तालुक्यातून गावावपातळीवर शिरकाव करतोय. आपल्या भागात करोनाची लागण नाही म्हणुन गर्दीत वावरणाऱ्यांनी गाफिल राहून सर्वांचे आरोग्य धोक्यात आणू नका.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24