तू पूढच्या तारखेला जर आमच्या विरुद्ध साक्ष दिलीस तर तूला ….

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील न्यायालयात विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोघी माय लेकीला धक्काबूक्की करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. तसेच स्कूटी गाडीचे नूकसान करण्यात आले.

ही घटना राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे ११ फेब्रुवारीला घडली. घटनेतील तीन आरोपी हे गिता दत्तात्रय कापसे राहणार शिलेगाव यांच्या घरासमोर आले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तेव्हा त्यांनी गिता यांच्या स्कूटी गाडीची तोडफोड केली. तसेच तू अहमदनगर येथील न्यायालयात आमच्या विरूद्ध साक्ष का दिली. असे म्हणून त्यांना धक्काबूक्की केली.

त्यावेळी त्यांची मुलगी साक्षी ही सोडवा सोडव करण्यासाठी आली. तेव्हा आरोपींनी दोघी माय लेकिला धक्काबूक्की करत लाकडी दांड्याने मारहाण केली.

तू पूढच्या तारखेला जर आमच्या विरुद्ध साक्ष दिलीस तर तूला व तूझ्या कुटुंबाला जिवे मारुन टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी आरोपी निलेश शेजवळ, लखन आण्णासाहेब म्हसे दोघे राहणार कोंढवड व दिगंबर दिलीप म्हसे राहणार शिलेगाव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.