अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : ‘ठेकेदारी करायची असेल तर एक लाख रुपये दे’, प्रकाश पोटेवर आणखी एक गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद कार्यालय तोडफोड प्रकरणी प्रकाश पोटे यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. तुला जर ठेकेदारी करायची असेल तर मला एक लाख रूपये दे, नाही तर तुला ठेकेदारी करू देणार नाही, असे म्हणत प्रकाश पोटे याने पैशांची मागणी केली असा धाकड्याक आरोप पोटे याच्यावर करण्यात आला आहे.

विलास आप्पासाहेब जगताप (वय ४९, रा. बालाजी चेंबर्स, कुष्ठधाम रोड, सावेडी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे. पैशाची मागणी करत माझ्यासह सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी जिल्हा परिषद गेटसमोर घडली असेही जगताप यांनी म्हटले आहे.

जगताप हे त्यांच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या गेटसमोर उभे असताना पोटे तेथे आला. त्याने तुला जर ठेकेदारी करायची असेल तर मला एक लाख रूपये दे नाहीतर तुला ठेकेदारी करू देणार नाही. तू यापूर्वी केलेल्या कामाचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत ते मी व्हायरल करील, अशी त्याने धमकी दिली.

तसेच यापूर्वी देखील प्रकाश पोटे याने टाकळी काझी येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू असताना ते बंद पडून मला व माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पोटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोटे याच्या विरोधात जिल्हा परिषदेत तोडफोड केल्याप्रकरणी, तसेच आणखी एका ठेकेदाराला प्रत्येक कामापोटी २५ हजारांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Ahmednagarlive24 Office