अहमदनगर : वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनचालक हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात. हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यांस प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यात सन २०२२-२०२३ मध्ये घडलेल्या अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार हेल्मेटट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे.
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यांस प्रतिबंध करण्यात आला आहे.
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करतांना आढळून आल्यास अशा विनाहेल्मेट दुचाकीवर येणाऱ्यांची यादी परिवहन कार्यालयास कळविण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर मोटार वाहन कायद्यातील विहीत तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.