अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालपरी अर्थात एसटी अनेक महिन्यांपासून जिल्ह्याबाहेर धावलेली नाही. परंतु आता या नियमांत बदल झाले असून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू झाल्या आहेत.
लॉकडाऊन सुरू झाले तेव्हाच राज्यातील एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रिया सुरू होऊन अनेक निर्बंध शिथील होत असताना मर्यादित एसटी सेवेलाही परवानगी देण्यात आली होती.
त्यानुसार बससेवा फक्त जिल्हांतर्गत सुरु करण्यात आली होती. आता जिल्ह्याच्या बाहेर कोरोनाचे नियम पाळून एसटी धावणार आहे. त्यामुळे अहमदनगर येथील तारकपूर आगारातून नियमित बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
त्यात कल्याण, नाशिक, पुणे, धुळे आदी ठिकाणी बस सोडण्यात येत आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक अविनाश कल्हापुरे यांनी दिली.
तारकपूर आगारातून कल्याणसाठी पाच, नाशिकसाठी पाच, पुण्यासाठी पाच, धुळे एक, संगमनेरसाठी दोन, कोपरगावसाठी दोन, पाथर्डीसाठी दोन, अशा एकूण 22 फेऱ्या सुरू केल्या आहेत.
असे आहे बसचे वेळापत्रक-:
१) अहमदनगर -कल्याण > ७.००; ८.००; ९.०० ; १० ; ११
२)अहमदनगर-नाशिक > ८.००; ९.००; १०.००; ११ ; १२
३)अहमदनगर-पुणे > ७.००; ८.००; ९.००; १२.००; १४.००
४)अहमदनगर-धुळे > ७.००
५)अहमदनगर-संगमनेर> ७.००; १३.३०
६)अहमदनगर-कोपरगाव > ७.३०; १४
७)अहमदनगर-पाथर्डी > ८.३०; १३.००
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved