Ahmednagar News : छोटा-मोठा व्यापारी टिकवायचे असेल तर ऑनलाईन शॉपिंग बंद करून स्थानिक व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सुरूवातीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग महत्त्व नसल्याने सर्व प्रकारची खरेदी स्थानिक व्यापाऱ्यांकडे होत असल्याने बाजारपेठेत चांगल्या प्रकारे आर्थिक उलाढाल होत होती. परंतु गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण शहरी भागासह ग्रामीण भागात देखील वाढल्याने कोपरगावची बाजारपेठेवर ऑनलाईन शॉपिंगचा दुष्परिणाम दिसून येत आहे.

त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील छोटा-मोठा व्यापारी टिकवायचे असेल तर ऑनलाईन शॉपिंग बंद करून स्थानिक व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करावे, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोपरगावकरांना केले आहे.

व्यापारी किंवा दुकानदार कोणीही असो प्रत्येकाला वाटते आपल्या कडील माल चांगल्या कंपनीचा असल्याने खरेदी चांगल्या प्रकारे होईल. परंतु तसे न होता, सध्या ऑनलाईनला शॉपिंगला महत्व दिले जात असल्याने कोपरगावातील अनेक व्यापाऱ्यांवर आर्थिक संकटात आले आहे.

बाजारपेठेत कपडे इलेक्ट्रिक साहित्य, मोबाईल, असे अनेक प्रकारचे विक्री करणारे व्यापारी दुकाने थाटुन बसलेले असताना व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिवसभर बसलेला असतो.

अशीच परिस्थिती गंभीर होत गेली तर व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहायला वेळ लागणार नाही. सध्या गणेशोत्सव, महालक्ष्मी, घटस्थापना या सारखे सणासुदीचे दिवस सुरू झाले आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर ऑफर दिले जात असल्याने नागरिकांनी स्थानिक दुकानदारांकडे पाठ फिरवली आहे.

देशभरात कोरोनाचे संकट आले त्यावेळी आपल्याच छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी उधारीवर माल देवून मदत केली. आज याच व्यापाऱ्यांवर संकट आले असून सर्वांनी दुकानदारांना मदतीचा हात देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडावी.

तालुक्यातील सर्व नागरिकांनी वस्तू व साहित्यांची खरेदी ऑनलाइन शॉपिंग न करता स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.