घोड नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणारी बोट जप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- घोड नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणारी ९ लाख ५० हजार किमतीची बोट बेलवंडी पोलिसांनी गुरुवारी जप्त केली. बोटमालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापूर शिवारात कोल्हेवाडी येथे बेकायदा वाळूउपसा सुरू होता. बेलवंडी पोलिसांनी पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून वाळूचा उपसा करणारी बोट जप्त केली.

बोटमालक गोरख पाचारणे आणि अनोळखी बोटचालकाविरोधात बेकायदा वाळू चोरी, तसेच पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24