अहमदनगर बातम्या

या भागात भर दिवसा वाळूची अवैध तस्करी; कायद्याचा धाक उरलाच नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- शासकीय कारवाईचा धाक कुणालाही वाटत नाही यामुळे आजही भर दिवसा अवैध रित्या वाळू चोरली जात असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे.

यातच संगमनेर तालुक्यातील बोटा-येलखोप परिसरातील कचनदी पात्रातून दिवसा-ढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मात्र महसूल अधिकारी या उपशाविरुद्ध कारवाई मारत नसल्याचे दिसून येत आहे. बोटा-येलखोप परिसरातील कच नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा दिवसा-ढवळ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कच नदी बोटा परिसराला वरदान म्हणून ओळखली जाते. हि नदी पाऊस पडला की काही काळ वाहती होते त्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उध्दभवते.

अनेकांच्या विहिरी नदी काठी असून त्या विहिरीच्या काही फुटांच्या अंतरावर अवैध वाळू उपसण्याचा गंभीर प्रकार राजरोस होत असतानही संबंधित यंत्रणेचे डोळे बंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाळू वाहतूक होत असताना महसूल तलाठी उघड्या डोळ्याने बघतात कार्यवाही मात्र कसलीही केली जात नाही. यावरून वाळूमाफियांना महसूलचे वरिष्ठ अधिकारी अर्थपूर्ण तडजोडी करून

संबंधित वाळू चोरांना अभय देत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित वाळू वाहतुक थांबवावा अन्यथा लवकरच नदी पात्रात आंदोलन करण्याच्या इशारा नदी काठच्या शेतकर्‍यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office