अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. विशेषबाब म्हणजे एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून 95100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन,
1950 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू 125 लिटर असा एकूण 95,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे . पोलिसांनी घटनास्थळाहून सोमनाथ माधव बर्डे,
इंदुबाई माळी (पूर्ण नाव माहीत नाही), 3 अज्ञात (फरार) सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यांचेविरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याचे समजते.