अहमदनगर बातम्या

IMP NEWS : पावसामुळे ”या’ धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- राज्यात पुन्हा एकदा वरुणराजाने आगमन केले असून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे.

यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. यातच जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मंगळवारी झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवारपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे.

अजूनही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दि.29 सकाळी सात वाजेपर्यंत 90 टक्क्याहून अधिकच जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे.

प्रकल्पात 100 टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. त्यामुळे द्वार परिचलन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे आज 11 वाजता उघडण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे.

तरी पैठण शहर तसेच गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे या प्रकल्पात 100 टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो.

त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे लवकरच उघडावे लागतील यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Ahmednagarlive24 Office