अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- नगर ते मनमाड रेल्वे महामार्गाच्या शेजारून जाणाऱ्या इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईन कामास विरोध करत. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश आले आहे.
या प्रश्नाबाबत आठ दिवसात कंपनीने निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या
बैठकीमध्ये इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या बाजू ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत चांगलेच धारेवर धरले.
तसेच याबाबत आठ दिवसात कंपनीने लिखीत स्वरुपात आपले म्हणणे सादर करावे, अशा सूचना केल्या. यानंतर संतप्त झालेल्या शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख मंत्री बच्चू कडू यांच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून मंत्रालयात होणाऱ्या पुढील बैठकीसंदर्भात माहिती जाणून घेतली.