शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोमवारी बाजार समिती राहणार बंद…!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आयोध्यात सोमवारी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभर विविध धार्मीक कार्यक्रम साजरे होणार आहेत. त्याअनुषंगाने नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभुमीवर सोमवारी बाजार समितीने देखील सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी बाजार समितीत कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जाणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सुमारे पाचशे वर्षांचा वनवास संपुण प्रभु श्रीराम आयोध्येत विराजमान होणार आहेत. आयोध्येत श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून भव्य दिव्य सोहळा साजरा होणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त गावोगावी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा सोहळा साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य दिव्य सोहळयानिमित्त राज्य सरकारने शाळांसह इतर आस्थानांना देखील सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी देखील आपला शेतमाल या दिवशी बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.