गिर्यारोहकांसाठी महत्वाची बातमी… कळसुबाई -हरिश्चंद्रगड बाबत झाला महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनास बंदी घालण्याचा निर्णय आज मंगळवारी भंडारदरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनस्थळात बंदीबाबत अलीकडेच आदेश प्राप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर भंडारदरा व क्षेत्रातील सर्व गावांचे सरपंच,समिती अध्यक्ष, टेन्ट धारक यांची कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपयोजना बाबत शासन आदेशाची अंबलबजावणी करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती .

या सभेत कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना बंदी घालण्या संदर्भात एकमुखी सहमती दर्शविली. तसेच कोणताही पर्यटक अभयारण्य क्षेत्रात फिरताना दिसल्यास संबंधित गावची ग्राम वनव्यवस्थापन समिती दंडात्मक कारवाई करेल असाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Advertisement

…अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल… कळसूबाई-हरिश्चंद्रगड गाभाऱ्यातील पर्यटन शासनाचे पुढील आदेशप्राप्त होई पर्यंत बंद असणार आहे. पर्यटकांनी तपासणी नाक्यावर प्रवास करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव आणू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारानाशिक विभागाचे वन संरक्षक कशीकर यांनी दिला आहे.