रेशनधारकांसाठी महत्वाची बातमी, बोटांच्या ठशासाठी ताटकळण्याची गरज नाही, आता आली ‘ही’ नवीन सुविधा

Ahmednagarlive24 office
Published:
ration

रेशन दुकानातून धान्य घेताना बहुधा अनेकांना एका समस्येचा सामना नकीच करावा लागला असेल आणि ती म्हणजे बोटांचे ठसे न जुळण्याची समस्या. अनेक लोकांना बोटांचे ठसे बोटांवरील रेषा पुसल्याने ई-पॉस मशीनवर देता येत नाहीत किंवा ते मशीन थम घेत नाही.

यामुळे काहींना धान्य न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागते. परंतु आता प्रशासनाने यावर देखील एक उपाययोजना केली आहे. आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आय स्कॅनर देण्यात येणार आहे. तसेच २- जी ऐवजी ४-जी ई-पॉस मशीनचे स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात आले.

आधारबेस फोर जी ई-पॉस मशीन तसेच आय स्कॅनरची सुविधा असल्याने ग्राहकांना रेशनसाठी ताटकळत राहावे लागणार नाही. जिल्ह्यातील १८८७ दुकानदारांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये २५ मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १, २ व ३ मार्च असे तीन दिवस स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले होते.

ई पॉसमुळे रेशन ब्ल दुकानदारांसह शिधापत्रिकाधारकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे एका वर्षापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची या मागणी करण्यात आली होती. तसेच ही स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थीच्या संख्येतही वाढ झाली आहे.

आता शासनाने या रेशन दुकानांमध्ये फोर जी ई-पॉस मशीन कार्यन्वित केल्या असून, पुढील काही दिवसांमध्ये आय स्कॅनरचेदेखील वाटप केले जाणार आहे. यामुळे धान्य वितरण प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासोबत गतिमानता वाढली जाणार आहे. त्यामुळे आता रेशनधारकांसाठी ताटकळत उभे राहण्याची व रेशन पासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही.