Ahmednagar News : आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेत गुरुपौर्णिमेला विशेष स्थान आहे. हा सण गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण ते आपल्याला ज्ञान, शिक्षण आणि जीवन जगण्याची कला शिकवतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांचा आदर करतात. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी शिष्य विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. त्याच अनुषंगाने शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठा उत्सव साजरा करतात.
नगर जिल्ह्यातील शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दजांचे धार्मिक स्थळ असून देश-विदेश, राज्य-परराज्यातून आणि बाहेरील देशातून शिर्डी शहरात भाविकांची व त्यांचे वाहनांची प्रचंड गदी होत असते. दि. २०/०७/२०२४ ते दि. २२/०७/२०२४ या कालावधीत सालाबादप्रमाणे गुरुपोर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून, दरवषीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डी येथे दर्शनाकरिता येण्याची शक्यता असल्यामुळे भाविकांची व वाहनांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यातच अहमदनगर-मनमाड हा महामार्ग शिर्डी शहरातून श्री साईबाबा मंदिरासमोरुच जात असल्याने गर्दीच्या कालावधीमध्ये वाहतुकीमुळे भाविकांची गैरसोय होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये.
या करीता श्री साईबाबा मंदीर व परीसरात वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केल्याप्रमाणे दि.२०/०७/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वा. ते दि. २२/०७/२०२४ रोजी २३.०० वा. पावेतो शिडी श्री साईबाबा मंदिर परिसरात येणारी सर्व प्रकारची वाहतुक वाहने ही खालील रिंगरोडने वळविणेबाबत आदेश जारी करीत आहे.
अहमदनगर कडुन मनमाडकडे येणारे खाजगी व प्रवासी व इतर मोठ्या वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग : आरबीएल चौक व्दारका सर्कल चौक श्री साईनाथ हॉस्पीटल चौक श्रीराम सर्कल चौक झुलेलाल चौक लक्ष्मीनगर चौक टी पॉईट
मनमाड कडुन अहमदनगरकडे येणारे प्रवासी व इतर मोठ्या वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग : लक्ष्मीनगर चौक झुलेलाल चौक श्रीराम सर्कल चौक श्री साईनाथ हॉस्पीटल चौक व्दारका सर्कल चौक आर बी एल चौक
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, रुग्णहवाहिका, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.असे नमूद करण्यात आले आहे.